बटाट्याची साले फेकून देता, जरा थांब सालांपासून बनवा 'ही' भन्नाट रेसिपी

बटाटं सोलून झाल्यानंतर तुम्ही पण त्याची सालं फेकून देतात. तर जरा थांबा कारण या सालांपासूनही तुम्ही भन्नाट रेसिपी बनवू शकता.

Mansi kshirsagar
Sep 17,2023


बटाट्याच्या सालांपासून तुम्ही टेस्टी स्नॅक्स तयार करु शकता. शेफ रणवीर बरारा यांनी स्वतःच ही रेसिपी सांगितली आहे. एकदम सोपी रेसिपी तुम्हीपण ट्राय करुन पाहा


शेफ रणवीरने सांगितल्यानुसार, सुरुवातीला बटाटे सोलून घ्या. फक्त लक्षात घ्या बटाटे सोलताना उभे सोलून घ्या त्यासाठी सोलाण्याची मदत घ्या.


एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यात १ चमचा मीठ टाका. या पाण्यात बटाट्याची सालं 10 मिनिटांसाठी भिजवून ठेवा. त्यानंतर बटाट्याची साल गोल गोल करुन फुलासारखा आकार तयार करा. व टुथपिक लावा जेणेकरुन ते निघणार नाही.


एका भांड्यात 1 चमचा लाल मिरची, 1 चमचा आमचूर पावडर, स्वादानुसार मीठ टाकून हे मिश्रण एकजीव करुन घ्या व बाजूला ठेवून द्या.


आता एका कढाईत तेल घेऊन बटाट्याच्या सालीपासून तयार केलेल फुलं त्यात टाकून फ्राय करा.


त्यानंतर तयार केलेल्या मसाल्यात टाकून छानप्रकारे मिक्स करुन घ्या. मसाला बटाट्याला लागला पाहिजे हे लक्षात घ्या. संध्याकाळच्या चहा किंवा कॉफीसोबत तुम्ही हे खाऊ शकता.

VIEW ALL

Read Next Story