टाटांचा PA

उद्योग क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या रतन यांना त्यांच्या समाजोपयोगी कामांसाठी नावाजलं जातं. तुम्हाला माहितीये का, याच टाटांचा PA असणारा तरुणही त्यांच्यामुळं काही वर्षांपूर्वी प्रसिद्धीझोतात आला आहे.

Jun 26,2023

शांतनू नायडू

शांतनू नायडू असं त्या तरुणाचं नाव असून, एखादा कार्यक्रम असो किंवा खुद्द रतन टाटा यांचा वाढदिवस असो. शांतनू त्यांची साथ देताना दिसतोच.

उल्लेखनीय जबाबदारी

रतन टाटा यांचं शांतनूशी एक खास नातं असून, तो त्याच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक आहे. वयाच्या 29 व्या वर्षीच तो टाटा उगद्योग समुहात उल्लेखनीय जबाबदारी पार पाडताना दिसतोय.

शांतनूचा पगार

राहिला मुद्दा शांतनूच्या पगाराचा, तर तो आकडा ऐकून तुम्ही हैराण व्हाल. त्याहूनही अनेकजण तो काय करतोय आणि आपण काय करतोय असं म्हणत तुलनाही करू लागाल.

आकडा वाचून हादरलात ना?

सूत्रांच्या माहितीनुसार शांतनूला महिन्याला जवळपास 7 लाख रुपये इतका पगार मिळतो. आकडा वाचून हादरलात ना?

वर्षाची एकूण कमाई

इतकंच नव्हे, तर एका वर्षाला त्याच्या कमाईचा एकूण आकडा साधारण 6 कोटी रुपयांच्या घरात आहे. शांतनूही रतन टाटा यांच्याकडून उद्योग जगतातील धडे शिकताना दिसतो.

स्टार्टअप

वयोवृद्ध व्यक्तींसाठीच्या 'गुडफेलोज' या स्टार्टअप कंपनीची त्यानं सुरुवात केली आहे. या कंपनीत रतन टाटा यांनीही गुंतवणूक केलिये.

प्रेम आणि जिव्हाळा

श्वानांप्रती असणाऱ्या प्रेमाच्या आणि जिव्हाळ्याच्या भावनेमुळं रतन टाटा आणि शांतनूची पहिली भेट झाली.

रस्ते अपघात

रस्त्यावरील अपघातांमध्ये श्वानांचा जीव जावू नये यासाठी त्यानं त्यांच्या गळ्यात रात्रीच्या अंधारात चमचमणाऱ्या पट्ट्यांचा वापर सुरु केला होता.

टाटा समुहाशी जोडणारा दुवा

श्वानांवर विशेष जीव असणाऱ्या रतन टाटा यांना त्याची ही कल्पना भावली आणि हा एक दुवा त्याला थेट टाटा समूहाशी जोडण्यास कारणीभूत ठरला.

VIEW ALL

Read Next Story