सी-फूड खाण्याची आवड असणारे खवय्ये फार आवडीने कोळंबी म्हणजे Prawns खात असतात. पण ते खायचे म्हटलं तर एकतर हॉटेल गाठावं लागतं किंवा मग घऱी तयार करावे लागतात.
जर तुम्ही घरी कोळंबी खाण्याचा बेत आखत असाल तर तुम्ही विकत घेत असलेली कोळंबी ताजी आहे की नाही हे ओळखणं गरजेचं आहे. ते कसं ओळखायचं समजून घ्या...
कोळंबीला हात लावताच तुम्हाला ती ताजी आहे की नाही समजेल.
जर हात लावल्यावर कोळंबी चिकट किंवा लगद्यासारखी लागत असेल तर ती अजिबात खरेदी करु नका.
व्यवस्थित समजून घेण्यासाठी कोळंबीला हलक्या हाताने दाबा. यावरुनच तुम्हाला अंदाज येईल.
ताजी कोळंबी चमकदार आणि अर्धपारदर्शक असतात. तुम्ही पाहूनदेखील ते ताजे आहेत की नाही हा अंदाज लावू शकता.
ताज्या कोळंबीला नेहमीच थोडा खारट किंवा समुद्राचा वास येत असतो. तुम्ही ती खरेदी करण्याआधी वास घेऊनही पाहू शकता.
ताज्या कोळंबीचे डोळे नेहमी चमकत असतात. पण जर ते आत गेलेले दिसत असतील तर खरेदी करु नका.
कोळंबीच्या मिशा हलक्या गुलाबी किंवा लाल रंगाच्या असल्या पाहिजेत.
जर तुम्हाला ते तपकिरी किंवा हिरव्या रंगाचे दिसत असतील तर खरेदी न करणंच जास्त शहाणपणाचं आहे.