बऱ्याचवेळा वयाच्या 40 व्या वर्षी सतत काहीतरी गोड खायची इच्छा किंवा मूड स्विंगचा त्रास होतो. अशा परिस्थितीमध्ये काय करावे जाणून घ्या तज्ज्ञांकडून.
आहारतज्ज्ञ मनप्रीत कालेरा यांच्या मते वयाच्या 40 व्या वर्षी शरीरातील प्रोजेस्टेरॉन आणि इन्सुलिनची पातळी कमी होते. त्यामुळे सतत काहीतरी गोड खावे असे वाटत राहते.
या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आणि हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही देखील 'हे' उपाय करू शकता.
शरीरातील संप्रेरकाचे संतुलन राखण्यासाठी संध्याकाळी 1 कप चेस्टबेरी चहाचे सेवन करणं फायदेशीर ठरते.
तंदुरूस्त रहायचे असेल तर दररोज 1 रताळ्याचे सेवन करावे.
तिळामध्ये अनेक पोषक घटक असतात. कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्याने शरीराला फायदे मिळतात.
ब्रोकोली मध्यम तळून खाल्ल्यास शरीरातील हामोर्न्स संतुलित राहण्यास मदत होते.
भोपळ्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. अशा परिस्थितीत भोपळ्याचे सेवन केल्यास हार्मोन्य नियंत्रित राहण्यास मदत होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)