गणेशाच्या आगमनाने सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. विघ्नहर्त्याच्या येण्याने भरपूर सकारात्मकता आली आहे.
आपल्या लाडक्या बाप्पासाठी आकर्षक आरास, नैवेद्य करण्यात भक्तगण मग्न झालेत.
गणपतीला प्रसन्न करण्यासाठी भक्त मंत्रोच्चारांचे पठन करतात. पण या मंत्रांचे अर्थ तुम्हाला महितीयेत का?
वक्र सोंड, विशाल शरीर, करोडो सूर्यासारखे महान प्रतिभा असलेले. हे प्रभो, माझी सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण कर.
या मंत्रात गणेशाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. गणेशजी अडथळे दूर करणारे, वरदान देणारे, देवांचे प्रिय, लंबोदर, सर्व कलांचे जाणकार, जगाचे कल्याण करणारे, ज्याचे मुख गजासमान आहे, वेदांनी सजलेले आहे. या पार्वतीच्या पुत्राला वंदन. हे गणनाथ, आम्ही तुला नमस्कार करतो.
हे हेरंब (भगवान गणेशाचे नाव), तुला कोणत्याही प्रकारे मोजता येणार नाही. तू प्राण्यांना आपलेसे करतोस. तुझे वाहन उंदीर आहे. तू सर्व जगाचा अधिपती आहेस, तुला वारंवार नमस्कार असो.
हा देखील श्रीगणेशाचा एक अतिशय लोकप्रिय मंत्र आहे. एकादंताला आपण नमस्कार करतो असे या मंत्रात म्हटले आहे. आपण भगवान वक्रतुंडाचे ध्यान करतो. दंती म्हणजेच भगवान गणेश आपल्याला आशीर्वाद देवो.
या मंत्रात म्हटले आहे की, ज्याला एक दात आहे, ज्याचे मुख सुंदर आहे. त्याला विनम्र अभिवादन. जो त्याचा आश्रय घेणाऱ्यांचे रक्षण करतो, जो सर्व प्राणिमात्रांचे दुःख दूर करतो त्याला नमस्कार असो.