एक्स्प्रेस, मेल आणि सुपरफास्ट ट्रेनमध्ये नेमका फरक काय?
भारतीय रेल्वेनं दर दिवशी लाखोंच्या संख्येनं प्रवासी प्रवास करतात. देशाच्या विविध भागांमध्ये प्रवास करतात.
वेगाच्या अनुषंगानं देशातील विविध छिकाणी विविध रेल्वेगाड्या धावतात. यापैकी मेल एक्स्प्रेसचा वेग सर्वात कमी असतो.
मेलगाड्या साधरण 50 किमी ताशी वेगानं धावतात. भारतात एक्स्प्रेस ट्रेन सेमी प्रायॉरिटी असणाऱ्या रेल्वेगाड्या आहेत. त्यांचा वेग 55 किमी इतका असतो.
सुपरफास्ट रेल्वेगाड्यांचा वेग मेल आणि एक्स्प्रेसहून अधिक असतो. हा वेग साधारण ताशी 110 किमी किंवा त्याहून जास्त असतो.
मेल आणि एक्स्प्रेसच्या तुलनेत सुपरफास्ट गाड्यांचं तिकीटही जास्त असतं.
काय म्हणताय मग? पुढच्या वेळी रेल्वेनं जाताना हा फरक सहप्रवाशांना सांगणार ना?