केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील लोकसुद्धा ओडीशा येथील जगन्नाथ पुरी मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
सनातन धर्मात चारधाम यांना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. धार्मिक कथेनुसार, इथे दर्शन घेतल्याने आपल्या पापांचा नाश होऊन पुण्य प्राप्त होते.
गर्ग वंशच्या राजाने 12 व्या शतकात जगन्नाथ मंदिराची निर्मिती केली होती.
परंतु, या जगन्नाथ मंदिराची अशी काही रहस्ये आहेत, ज्यावर विश्वास ठेवणंसुद्धा कठीण आहे.
मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या मते, मंदिराच्या आत गेल्यानंतर समुद्राच्या लाटांचा अजिबात आवाज येत नाही.
मंदिरच्या कळसावर लावलेला झेंडा हा नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो आणि रोज हा झेंडा बदलला जातो.
जर मंदिराचा झेंडा बदलला नाही तर हे मंदिर 18 वर्षांसाठी बंद राहील, असं मानलं जातं.
पौराणिक कथेनुसार, जगन्नाथ मंदिरावरुन पक्षी किंवा विमान उडू शकत नाहीत.