रेल्वे ट्रॅक हे लोखंडाचे बनलेले असतात असे सर्वसाधारणपणे लोकांना वाटत असतं.
तुम्हालादेखील आजपर्यंत असेच वाटत आले असेल तर तुम्ही चुकीचे आहेत.
रेल्वे ट्रॅक लोखंडाच्या अजिबात बनलेल्या नसतात.
घरी असलेल्या लोखंडाच्या सामानाल गंज लागलेला तुम्ही पाहिला असेल.
पण ऊन, पाऊस, वाऱ्याचा मारा सहन करुनदेखील ट्रॅकवर कोणता परिणाम झालेला दिसत नाही.
पण हे ट्रॅक वर्षानुवर्षे टिकून राहतात. पण त्यांच्या मजबूतीत कोणता परिणाम होत नाही.
रेल्वेचा ट्रॅक लोखंडाच्या नव्हे तर विशिष्ट प्रकारच्या स्टिलने बनलेल्या असतात. ज्याला मॅगनीज स्टील असे म्हणतात.
जे स्टिल आणि मॅंगलॉयने मिळून बनवले जाते. याला हाय कार्बन स्टिल असेही म्हटले जाते.
यामध्ये 12 टक्के मॅगनीज आणि 0.8 टक्के कार्बनचे मिश्रण असते. या मिश्रणाला मॅगनीज स्टील म्हटलं जातं.