यासाठी लेखी परीक्षा, प्रत्यक्ष मुलाखत आणि वैद्यकिय चाचणी असे टप्पे उमेदवारांना ओलांडावे लागतात.
भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलट पदासाठी अनेकदा भरती प्रक्रिया सुरु असते.
उमेदवार भारतीय नागरिक असावेत. त्यांचं वय 18 ते 30 वर्षांमध्ये असावं. आरक्षित प्रवर्गांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
सध्याच्या घडीला या नोकरीसाठी इच्छुकांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा 12 वी पर्यंतचं शिक्षण घेतलेलं असावं. शिवाय त्यांना नॅशनल काऊंसिल फॉर वोकेशनल ट्रेनिंग मधून ITI पर्यंतचं शिक्षण घेतलेलं असावं.
भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलटची नोकरी Group B मध्ये येते. इथं रेल संचालनाची जबाबदारी लोको पायलटवर असते.
दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांना नोकरीच्या संधी मिळत असल्या तरीही यातही काही अटींची पूर्तता आवश्यक आहे.