बदाम हे नैसर्गिकरित्या उष्ण असतं म्हणून ते भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो.
बदाम कधीही खाल्ले तरी आरोग्यासाठी फायद्याचेच असतात. मात्र जास्तीत जास्त फायदा हवा असेल तर बदाम सकाळच्या वेळी खाणं फायद्याचं असतं.
रिकाम्या पोटी बदाम खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
बदामामध्ये ओमेगा थ्री फॅटी अॅसिड असतं. यामुळे हृदय निरोगी राहतं आणि हृदयासंदर्भातील समस्यांचा धोका कमी करण्यासाठी याचा फायदा होता.
रिकाम्या पोटी बदाम खाणं हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगलं असतं.
वय वाढत जातं त्याप्रमाणे बौद्धिक क्षमता क्षीण होते जाते. मात्र बदाम खाल्ल्यास बुद्धी तल्लख राहण्यास मदत होते.
बदामामध्ये व्हिटॅमीन इ असतं. त्यामुळे बदामाचं सेवन केल्याने त्वचेसंदर्भातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.
त्वचेच्या आरोग्यासाठीही सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाणं फायद्याचं असतं.
ज्यांना अशक्तपणाचा त्रास असतो, शरीरामध्ये ऊर्जा कमी असल्यासारखं वाटतं त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाल्ल्यास आरोग्याला फायदा होतो.
सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाणं डायबेटिजचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी फार फायद्याचं ठरतं.