IRCTC अ‍ॅप, वेबसाइटवरुन ट्रेनमधील रिकाम्या जागा कशा शोधायच्या?

Berth Status In Train: अचानक ट्रेनमधून प्रवास करायला लागल्यावर कन्फर्म तिकीट मिळणं अशक्यच असतं. मग दूरवरच्या प्रवासाच बसायला सीट्स कशी मिळणार? असा प्रश्न आपल्याला पडतो.

यावरचा उपाय

विशेषत: कुटुंबसोबत असेल तर बसायला सीट मिळणे आवश्यक असते. तुम्हालादेखील ही चिंता कधी ना कधी भेडसावली असेल. तर मग यावरचे निराकरण जाणून घेऊया.

जागा शोधेणे सोपे

IRCTC अ‍ॅप आणि वेबसाइट वापरून चालत्या ट्रेनमध्ये रिकामी जागा शोधेणे सोपे आहे. असे केल्यास तुम्हाला TTE च्या फेऱ्यादेखील माराव्या लागणार नाहीत. तुम्ही लॉग इन न करता IRCTC अॅप किंवा वेबसाइट वापरून हे सहजपणे तपासू शकता.

स्टेप्स फॉलो करा

चालत्या ट्रेनमध्ये रिकाम्या जागा शोधण्याचा एक अतिशय सोपा मार्ग आहे. तुमच्याकडे कन्फर्म केलेले तिकीट नसले तरीही पुढे देण्यात आलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही ट्रेनमध्ये सहजपणे रिकामी जागा मिळवू शकता.

रिक्त जागा कशी शोधायची?

IRCTC वेबसाइटवर जा. होमपेजवर तिकीट बॉक्सच्या अगदी वर, तुम्हाला चार्ट/रिक्त जागा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि तो आरक्षण चार्ट नावाचा एक नवीन टॅब उघडेल.

बर्थनुसार रिकाम्या जागा

पहिल्या बॉक्समध्ये ट्रेनचे नाव/नंबर आणि दुसऱ्या बॉक्समध्ये बोर्डिंग स्टेशन टाका. Get Train Chart Now वर क्लिक करा. आता रिक्त जागांचा तपशील देणारा रिझर्वेशन चार्ट दिसेल. तुम्ही वेगवेगळ्या वर्गांमध्ये आणि वेगवेगळ्या डब्यांमध्ये, अगदी बर्थनुसारही रिकाम्या जागा शोधू शकता.

IRCTC अ‍ॅप वापरून जागा शोधा

तुम्ही मोबाईल फोनवर अधिकृत IRCTC अ‍ॅप वापरू शकता. हे Android आणि iOS अ‍ॅप स्टोअर्सवर उपलब्ध आहे. डाउनलोड झाल्यानंतर रिक्त जागा बुकींग करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

रिझर्व्हेशन पेज

IRCTC अ‍ॅप उघडा. ट्रेन आयकॉनवर टॅप करा. चार्ट वॅकेन्टवर क्लिक करा. हे मोबाइल वेब ब्राउझरवर रिझर्व्हेशन पेज उघडेल.

रिकाम्या बर्थची संख्या

ट्रेनचे नाव/नंबर तसेच बोर्डिंग स्टेशन यांसारखे प्रवास तपशील भरा.तुम्हाला रिकाम्या बर्थच्या संख्येसह स्क्रीनवर उपलब्ध रिकाम्या बर्थची संख्या दिसेल.

लॉगइनची गरज नाही

विशेष म्हणजे हे सर्व तपशील पाहण्यासाठी तुम्हाला IRCTC अॅपमध्ये लॉग इन करण्याची आवश्यकता नाही.

VIEW ALL

Read Next Story