Pitru Paksha 2024 : पितृपक्षात काय करावं आणि काय करू नये?
पितृपक्षात नवीन वस्त्र, सोनं, चांदी खरेदी करणे अशुभ मानलं जातं.
पितृपक्ष काळात केस आणि नखं कापू नयेत.
शास्त्रानुसार पितृपक्ष काळात कपडे आणि बूटंची खरेदी न करावी.
पितृपक्ष काळात विवाह, धार्मिक शुभ कार्य करण्यास मनाई असते.
पितृपक्ष काळात कांदाआणि लसूणसह तामसिक पदार्थांचं सेवन करणे अशुभ मानले जाते.
पितृ दोषापासून मुक्तीसाठी पितृपत्रात पिंडदान करावे.
पितृपक्ष काळात विवाहितांनी ब्रह्मचर्याचं पालन करावे.
पितृपक्ष पंधरवड्यात कावळ्यासोबत कुत्रा, गाय आणि मुंग्यांना भोजन देणं शुभ मानलं जातं.
पितृपक्षात ब्राह्मनांना भोजन आणि वस्त्र दान शुभ मानलं जातं.
पितृपक्षात शुभ कार्य वर्जित असल्याने गृह प्रवेश करता येत नाही.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)