भारतामधील पहिली कागदी नोट कोणी जारी केली ठाऊक आहे का? जाणून घ्या भारतीय चलनाबद्दलची रंजक माहिती
शेर शाह सूरीने भारतामध्ये व्यवहारिक कामांसाठी रुपया नावाचा चांदीचं नाणं पहिल्यांदा जारी केलं होतं. मुघल काळाबरोबरच, मराठा राजवट, ब्रिटीश राजवटीतही हे चलन कायम राहिलं.
भारतामध्ये पहिल्यांदा कागदी चलन बँक ऑफ हिंदुस्तान (1770-1832), जनरल बँक ऑफ बंगाल अॅण्ड बिहार (1773-75) आणि बंगाल बँकने (1784-91) जारी केलं होतं.
भारताने 1957 साली चलनामधील दशांश प्रणाली पद्धत स्वीकारली. म्हणजेच 1 रुपयामध्ये 100 पैसे असतील निश्चित करण्यात आलं.
भारतीय नोटेवर 15 वेगवेगळ्या भाषांमध्ये नोटेचं मूल्य किती आहे हे लिहिलेलं असतं.
कायद्यामधील कलम 22 नुसार भारतामध्ये चलनी नोटा जारी करण्याचा अधिकार केवळ रिझर्व्ह बँकेकडे आहे.
भारतीय चलन बदलून पौंड करण्याची इंग्रजांचा विचार होता. मात्र रुपयाच्या मुल्यामुळे त्यांना हे शक्य झालं नाही.
1917 साली भारताच्या 1 रुपयाचं मूल्य अमेरिकेच्या जवळजवळ अर्ध्या डॉलर इतकं होतं. 1 रुपया म्हणजे 0.314 डॉलर असा दर तेव्हा असल्याचं आरबीआयचे रेकॉर्ड सांगतात.
भारत 1947 साली स्वतंत्र झाल्यानंतर भारताने 1 रुपयाचं मूल्य 1 डॉलर इतकं केलं.
हळूहळू भारतावरील कर्ज वाढू लागल्यानंतर इंदिरा गांधींनी कर्ज फेडण्यासाठी रुपयाचे मूल्य कमी करण्यास सुरुवात केली.