शनिवार 21 सप्टेंबरला आतिशी मार्लेना यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याबरोबरच त्यांना दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला.
आतिशी यांच्या आधी भाजपच्या सुषमा स्वराज आणि काँग्रेसच्या शीला दीक्षित यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र सांभाळली आहेत.
काँग्रेसच्या शीला दीक्षित यांनी 1998 मध्ये दिल्लीचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं. तब्बल 15 वर्ष आणि 25 दिवस त्या मुख्यमंत्री पदावर होत्या.
भाजपच्या फायरब्रांड नेत्या सुषमा स्वराज यांनीही 1998 मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यांचा कार्यकाळ केवळ 52 दिवस इतकाच होता.
शीला दीक्षित यांच्यानंतर जवळपास एका दशकाने आतिशी यांच्या रुपाने दिल्लीला महिला मुख्यमंत्री मिळाल्या आहेत.
आतिशी या दिल्लीच्या कालकाजी मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. केजरीवाल सरकारमध्ये सर्वाधिक विभाग त्यांच्याकडे होते.
आतिशी यांना अरविंद केजरीवालांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आमदारांच्या बैठकीत एकमताने आतिशी यांना मुख्यमंत्री निवडण्यात आलं.