भारताचं 'मिशन चांद्रायन-3' आपल्या ध्येयाच्या दिशेने यशस्वीरित्या पुढे सरकतंय
ISRO कडून 'मिशन चांद्रायन-3' बद्दल वेळोवेळी अपडेट माहिती दिली जात आहे.
ISRO ने आता नव्याने चांद्रायन-3 चंद्राच्या किती जवळ पोहोचलंय याची माहिती दिली आहे.
चांद्रयान-3 हे लवकरच चंद्राच्या चौथ्या कक्षेत दाखल होणार असल्याची माहिती ISRO ने दिली आहे.
चांद्रयान-3 ची पहिली कक्षा युती यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. चांद्रयान-3 हे सामान्य स्थितीत असल्याची माहिती इस्रोच्या शास्त्रज्ञांनी दिली आहे.
काही दिवसातच यानाचा पृथ्वीभोवतीच्या कक्षेत संचार होईल. मग चंद्राजवळच्या दीर्घ वर्तुळाकार कक्षेत यान स्थिरावेल.
साधारणपणे पाच ऑगस्टच्या दरम्यान चंद्राच्या कक्षेत चांद्रयानाचा प्रवेश होईल. 23 ऑगस्टला चांद्रयानाची गती कमी होईल.
23-24ऑगस्ट दरम्यान लँडर चंद्रावर उतरेल . 42 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान चंद्रावर पोहोचेल.
प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाचा शोध घेईल आणि अंतराळ केंद्रातील शास्त्रज्ञांना माहिती आणि डेटा पाठवत राहील.
14 जुलैला चांद्रायान-3 श्रीहरिकोटामधल्या स्पेस सेंटरमधून दुपारी बरोब्बर 2 वाजून 35 मिनिटांनी चंद्राकडे झेपावलं