कशी घ्याल काळजी?

सुट्टीसाठी बाहेर जाताय? घरातल्या रोपट्यांची 'अशी' घ्याल काळजी

घराची शोभा वाढवणारी रोपं

घराची शोभा वाढवणारे हे घटक कधी इतके महत्त्वाचे होतात ते कळतही नाही. अशा या अतीव महत्त्वाच्या घटकांची काळजी घेतली जाणंही तितकंच महत्त्वाचं.

गरजेनुसार पाणी

त्यांना गरजेनुसार पाणी देणं, खत घालणं, त्यातील तण आणि सुकलेला पालापाचोळा काढणं अशा अनेक पद्धतींनी झाडांची काळजी घेतली जाते.

रोपांचं काय होणार?

राहिला मुद्दा बाहेर गेल्यावर, घर बंद असल्यावर या रोपांचं काय होणार? याबाबतचा, तर आता त्याचीची चिंता करायला नको. कारण काही सोपे उपाय वापरून तुमच्या अनुपस्थितीतही ही रोपं टवटवीत राहणार आहेत.

कापडाचा वापर

एकत लक्षात ठेवा. तुम्ही दोन तीन दिवसांसाठी बाहेर जात असाल तर ज्या ठिकाणी रोपं आहेत तिथं थेट सूर्यप्रकाश येत असल्याच खिडकीवर हिरव्या रंगाचं कापड टाका.

सूर्यप्रकाश

कापडामुळं रोपांवर थेट येणारा सूर्यप्रकाश त्यांची नासधूस करणार नाही. त्यांच्या मातीत असणारा पाण्याचा अंश दीर्घ काळ टिकून राहील.

प्लास्टिकच्या बाटलीचा वापर

आठवड्याभरासाठी बाहेर जाणार असाल तर, प्लास्टिकच्या बाटलीचा वापर करूनही तुम्ही रोपांची काळडी घेऊ शकता. यासाठी पाण्यानं भरलेली बाटली रोपावर लटकवून तिच्या झाकणाला लहानसं छिद्र करा. ज्यातून थेंब थेंब पाणी कुंडीत पडेल.

रिकामं पोतं

रिकामं पोतं, किंवा तत्सम कापड ओलं करून कुंडीतील मातीवर ठेवा. हे कापड फार काळ ओलंच राहतं ज्यामुळं कुंडीतील मातीत पाण्याचा अंश कायम राहील.

नारळाचा वरील भाग

तुम्ही नारळाचा वरील भाग/ किशी कचरा समजून टाकून देत असाल तर तसं करू नका. कारण, घरातील लहानशा बागेसाठी हाच भाग फायद्याचा ठरतो. ही आवरणं पाण्यानं भरून कुंडीत ठेवल्यास त्याचा ओलावा रोपांना किमान पाच दिवस टवटवीत ठेवतो.

रोपांची काळजी

रोपांची काळजी घेण्यासाठीचे हे उपाय खर्चिक तर नाहीत पण, कठीणही नाहीत. त्यामुळं वापरून पाहा आणि चिंतामुक्त व्हा.

VIEW ALL

Read Next Story