तुम्हाला हव्या त्या भाषेत संदेश

तुम्हाला तुमच्या भाषेत मेसेज हवा असल्यास तसा पर्यायही उपलब्ध आहे. ज्याप्रमाणे हिंदीत मेसेज हवा असल्यास 'EPFOHO UAN HIN' असा मेसेज पाठवावा लागेल.

7738299899 वर पाठवा मेसेज

आपल्या रजिस्टर्ड क्रमांकावरुन 7738299899 वर SMS पाठवताना मेसेजमध्ये 'EPFOHO UAN' असं लिहा. यानंतर तुम्हाला मेसेज येईल.

SMS च्या माध्यमातूनही मिळेल माहिती

तुम्ही SMS च्या माध्यमातूनही पीएफ बॅलेन्सची माहिती घेऊ शकता. पण त्यासाठी तुमचा UAN सक्रीय असायला हवा.

रजिस्टर्ड मोबाइलवरुन मिस कॉल

पीएफ खात्यातील आपला बॅलेन्स जाणून घेण्यासाठी आपल्या रजिस्टर्ड मोबाइलवरुन 011-22901406 या क्रमांकावर मिस कॉल द्या. यानंतर तुम्हाला मेसेजच्या माध्यमातून माहिती दिली जाईल.

UAN सक्रीय हवं

पण या सेवेचा लाभ घेताना काही अटी आहेत. एकतर तुमचा मोबाइल क्रमांक रजिस्टर असला पाहिजे, तसंच UAN सक्रीय हवं आणि KYC पूर्ण असायला हवं.

खात्यातील व्यवहाराचीही माहिती

यावरुन तुम्हाला तुमच्या खात्यात नियमितपणे पैसे जमा होत आहेत की नाही याचीही माहिती मिळेल.

एका मिस कॉलवर माहिती

घरबसल्या तुम्ही अत्यंत आरामशीरपणे खात्यातील जमा रकमेची माहिती घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक मिस कॉल देण्याची गरज आहे.

PF मध्ये किती पैसे जमा?

कोणताही EPF सदस्य सहजपणे आपल्या खात्यात किती रक्कम जमा आहे हे तपासून पाहू शकतो. यासाठी इंटरनेटची गरज नाही.

PF म्हणजे पैसे बचत करण्याचा एक मार्ग

नोकरी करणाऱ्यांसाठी PF म्हणजे आपले पैसे बचत करण्याचा एक मार्ग आहे. पगारातील काही रक्कम पीएफमध्ये जमा होत असते.

VIEW ALL

Read Next Story