देशात डिजिटल व्यवहारात वाढ

देशात सध्या डिजिटल व्यवहार वाढला आहे. लोक व्यवहार करण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत.

अद्यापही रोख रकमेचा होतो व्यवहारात वापर

पण अद्यापही लोक व्यवहार करताना रोख रकमेचा वापर करण्यावरच भर देत आहेत. यामुळेच एटीएम आणि बँकेतून अद्यापही लोक रोख रकम काढताना दिसतात.

घरात आपण किती रोख रक्कम ठेवू शकतो?

पण तुम्हाला माहिती आहे का की घरात आपण किती रोख रक्कम ठेवू शकतो यासंबंधीही नियम आहे.

कोणतीही मर्यादा नाही

प्राप्तिकर विभागाच्या नियमानुसार, तुमच्या घरात हवी तितकी रोख रक्कम ठेवू शकता. यासंबंधी कोणतीही मर्यादा आखण्यात आलेली नाही.

स्त्रोत जाहीर करणं बंधनकारक

पण जर कधी तुमच्या घऱातील रोख रक्कम तपास यंत्रणेच्या हाती लागली, तर मात्र त्याचा स्त्रोत जाहीर करणं बंधनकारक असतं.

...तर होऊ शकते कारवाई

जर घरात ठेवलेली रोख रक्कम कुठून आली आहे, म्हणजेच त्याला स्त्रोत जाहीर करण्यास तुम्ही असमर्थ ठरलात तर तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

50 हजारापेक्षा जास्त रोख रक्कम काढताना पॅन कार्ड आवश्यक

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सनुसार, जर एखादी व्यक्ती 50 हजारापेक्षा जास्त रोख रक्कम काढत असेल तर त्याला आपलं पॅन कार्ड दाखवावं लागतं.

एका वर्षात 20 लाखांपर्यंत व्यवहार

एका वर्षात 20 लाखांपर्यंत रोख रक्कम जमा केली किंवा काढली जाऊ शकते. 2 लाखांहून अधिक कॅश पेमेंट केल्यास पॅन आणि आधार कार्ड दाखवावं लागतं.

सर्व कागदपत्रं व्यवस्थित ठेवा

जर तुम्ही पैसा योग्य मार्गाने कमावला असेल तर घाबरण्याची गरज नाही. फक्त तुमच्याकडे सर्व कागदपत्रं असतील याची खात्री बाळगा.

VIEW ALL

Read Next Story