भारतीयांना त्यांच्या वयाप्रमाणे सरासरी किती मिळतो पगार?

आपल्याला मिळणारा पगार हा वय, लिंग, शिक्षण, अनुभव, ठिकाण यावर अवलंबून असतो.

ग्लासडोअरच्या माहितीनुसार, एका भारतीयाला सरासरी वर्षाला 9 लाख 95 हजार 489 रुपये पगार मिळतो.

एका भारतीयाला सरासरी किमान 8 हजार रुपये ते कमाल 1 लाख 43 हजार रुपये दरमहा पगार मिळतो. फोर्ब्स अ‍ॅडवायझरमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे.

24 वर्षाआतील 90 टक्के भारतीय दरमहा सरासरी 11 हजार 937 रुपये पगार घेतात.

25 ते 34 वयोगटातील 90 टक्के भारतीय दरमहा सरासरी 25 हजार 181 रुपये पगार घेतात.

35 ते 44 वयोगटातील 90 टक्के भारतीय दरमहा सरासरी 33 हजार 639 रुपये पगार घेतात.

45 ते 54 वयोगटातील 90 टक्के भारतीय दरमहा सरासरी 30 हजार 667 रुपये पगार घेतात.

55 वर्षांवरील 90 टक्के भारतीय दरमहा सरासरी 25 हजार रुपये पगार घेतात.

महाराष्ट्रातील एक व्यक्ती दरमहा साधारण 20 हजार 110 रुपये पगार घेतो.

मुंबईतील एक व्यक्ती सरासरी वर्षाला 21 लाख 17 हजार 870 रुपये पगार घेतो.

देशातील पुरुष वर्षाला सरासरी 19 लाख 53 हजार 55 रुपये पगार घेतात.

भारतातील महिला वर्षाला सरासरी 15 लाख 16 हजार 296 रुपये पगार घेतात.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story