75 लाखांचं होम लोम घेतल्यास एसबीआयमध्ये 8.50 ते 9.85 टक्के इतक्या व्याजावर कर्ज मिळतं. बँक ऑफ बडोदामध्ये हे दर 8.40 ते 10.90 टक्के इतके आहेत.
युनियन बँक 75 लाखांच्या होम लोनवर 8.35 ते 10.90 टक्के इतकं व्याज आकारतेय. पंजाब नॅशनल बँकेत हे आकडे 8.40 ते 10.15 टक्के इतके आहेत.
बँक ऑफ इंडियाकडून गृहकर्जावर 8.40 ते 10.85 टक्के इतकं व्याज आकारलं जात असून, कॅनरा बँकेत हेच व्याजदर 8.40 ते 11.15 टक्के इतके आहेत.
युको बँकेत होम लोनवर 8.45 ते 10.30 टक्के व्याज आकारलं जात असून, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ही आकडेवारी 8.35 ते 11.15 टक्के इतकी आहे.
पंजाब अँड सिंध बँकेकडून होम लोनवर 8.50 ते 10.00 टक्के व्याज आकारलं जात असून, इंडियन ओवरसिज बँकेकडून 8.40 ते 10.60 टक्के व्याज आकारलं जात आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ही टक्केवारी 8.45 ते 9.80 टक्के इतकी आहे.
होम लोन आणि त्यावर आकारला जाणारा व्याज ही टक्केवारी प्रत्येक बँकेच्या धोरणानुसार बदलत असून, आता यापैकी कोणत्या बँकेशी केलेला व्यवहार आपल्यासाठी फायद्याचा हे पाहून घ्या.