घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे.
स्वत:च हक्काच घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं.
पण इतकी रक्कम हाती नसल्याने बहुतांशजण गृहकर्जाचा पर्याय निवडतात.
सर्व बॅंका, फायनान्स कंपन्या तुम्हाला घर घेण्यासाठी कर्ज देतात. यावेळी तुम्हाला महिन्याला किती ईएमआय बसेल? याची माहिती दिली जाते.
एचडीएफसी बॅंक ही देशातील अग्रगण्य बॅंक आहे. याचे ग्राहक दिवसागणिक वाढताना दिसतायत. इथे मिळणाऱ्या गृहकर्जाविषयी जाणून घेऊया.
एचडीएफसी बॅंकेचा स्टॅंडर्ड हाऊसिंग व्याजदर 9.40 टक्के ते 9.95 टक्के इतका आहे.
तुम्ही HDFC बॅंकेतून 30 वर्षांसाठी 60 लाखांचे गृहकर्ज 8.75 टक्के व्याजावर घेतलात तर महिन्याचा ईएमआय 40 हजार 202 रुपये इतका असेल.
तुमच्यावर आधीच कोणतं कर्ज नसेल तर हे कर्ज घेण्यासाठी तुमचा इन हॅण्ड पगार 94 हजार 404 रुपये इतका असायला हवा.
तुम्ही आधीच कोणतं कर्ज फेडत असाल तर तुमचा पगार यापेक्षा जास्त असायला हवा.