Himachal Pradesh River : हिमाचल प्रदेशामध्ये सध्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, वाटेत येणारी प्रत्येक गोष्ट या नद्यांच्या प्रवाहात नष्ट होताना दिसत आहे. मग ते मोठाले वृक्ष असो किंवा दुमजली घरं. चला पाहुया हिमाचल आणि नजीकच्या पर्वतरांगांतून नेमक्या कोणत्या नद्या वाहतात...
हिमालयात उगम पावणारी बियास नदी हिमाचलच्या मध्य भागातून वाहते. जिथून पुढे ती 470 किमीचा प्रवास करत पंजाबमध्ये सतलज नदीला मिळते.
हिमाचलमधून वाहणारी सतलज ही सर्वात मोठी नदी असून, ती पंजाब आणि पाकिस्तान प्रांतातूनही पुढे जाते. सताद्री असं या नदीचं आणखी एक नाव.
मुळची चंद्रभागा नदी हिमाचलमध्ये चिनाब नावानं ओळखली जाते. रामबाण, दोदा, किश्तवार, जम्मू असा प्रवास करत हि नदी हिमाचलहून पाकिस्तानपर्यंत जाते.
गंगेची उपनदी असणारी यमुना उत्तराखंडहून दिल्लीपर्यंत पोहोचते. हिमाचलमधून जाताना इथून पुढं चंबल, बेटवा, केन या भागांतून ही नदी वाहते.
देशाच्या उत्तर पश्चिमेपासून पाकिस्तानच्या पूर्व भागापर्यंत वाहणारी रावी नदीसुद्धा सिंधुच्या खोऱ्यातील एक नदी. पौराणिक काळात या नदीचं नाव होतं इरावती.
भारत- तिबेट सीमेनजीक उगम पावणारी ही नदी आहे बस्पा. तिच्यामुळंच बस्पाचं खोरं किंवा सांगलाच्या खोऱ्याची निर्मिती झाली आहे. हिमालयाचं खरं सौंदर्य या नदीच्या पात्रामुळं पाहता येतं.
पिन पार्वती पास येथे मततलाई ग्लेशियरमधून उगम पावणारी ही आहे पार्वती नदी. लाहौल, स्पिती, देबसा पास असं करत ही नदी भुंतरपर्यंत पोहोचते.
लाहौल स्पितीच्या अती उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतरांगांच्या उतारावरून स्पिती नदीचा उगम होतो. किन्नौर येथील खाबो येथे पोहोचल्यानंतर ही नदी सतलजशी एकरुप होते.