हॉलमार्क पाहूनच सोने घ्या

सोने खरेदी करण्यापूर्वी एक बाब लक्षात ठेवली पाहिजे. तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा.

May 04,2023

सोने - चांदी दर पाहा

सोने भावात प्रतितोळा 600 रुपयांची वाढ तर चांदीच्या भावात प्रति किलो 1 हजार 400 रुपयांची वाढ झाली आहे. आज सोन्याचे भाव 61 हजार 600 रुपये प्रतितोळ्यापर्यंत गेला आहे. तर चांदीचे भाव 77 हजार रुपये प्रतिकिलो इतका झालात. ऐन लग्नसराईत सोन्या चांदीचे भाव वाढल्यानं याचा ग्राहकांना फटका बसला आहे.

सोने दराचा उच्चांक

सोने दरात दिवसागणिक तेजी पाहायला मिळत आहे. देशांतर्गत बाजारातील सोने किमतींनी आज सुरुवातीच्या सराफा बाजारात नवा विक्रम नोंदवला. जागतिक बाजारपेठेबद्दल बोलायचे झाले तर येथे सोने विक्रमी उच्चांकी पातळीवर व्यवहार करत आहे.

चांदीही महागली

आज सोन्याचा भाव 61,400 रुपये प्रति 10 ग्रॅम असताना चांदीच्या दरातही वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आज दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 670 रुपयांनी तर चांदीचा भाव 1150 रुपयांनी वाढला आहे.

सोने दरात तेजी

सोने दरात तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX Gold Price) वर आज सोन्याचा भाव 61,400 रुपये प्रति 10 ग्रॅम (तोळा) झाला आहे. दोन दिवसांपूर्वी सोने दरात घसरण पाहायला मिळाली होती. सोने 59,700 रुपये तोळा होते. आज अचानक वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

सोने दर साठीपार

सोने खरेदी करण्याचा विचार असेल तर आज सोने दरात पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे. सोने दर 60,000 रुपयांच्यावर गेला आहे.

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

VIEW ALL

Read Next Story