या चित्रपटांमध्ये दिसली होती ईशा

'माधुरी भाभी'च्या भूमिकेने ईशाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली असली तरी तिने 'ट्यूबलाइट', 'कालाकांडी', 'आर्टिकल 15' आणि 'गिन्नी वेड्स सनी' यासारख्या प्रोजेक्टमध्ये काम केले आहे.

यावर्षी येणार मिर्झापूर 3

मिर्झापूर मालिकेचा सीझन 3 यावर्षी रिलीज होणार आहे. मात्र याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

मिर्झापूर 3 ची प्रेक्षकांना प्रतिक्षा

दुसरीकडे माधुरी भाभीला पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. दुसरीकडे माधुरी भाभी'चे हे इन्स्टावरी फोटो पाहून लोकांची उत्कंठा आणखीनच वाढली आहे.

कास्टिंग डायरेक्टरकडे ऑडिशनच्या 500 टेप्स

ईशा म्हणाली मिर्झापूरनंतर, मी जाणीवपूर्वक ऑडिशन न देण्याचा निर्णय घेतला होता कारण हे दहा वर्षांपासून करत होती. पण सास बहू और फ्लेमिंगोसाठी तिने ऑडिशन दिले

नवीन काम मिळेपर्यंत घरी बसून होते

सास बहू और फ्लेमिंगो मिळेपर्यंत मी मिर्झापूरनंतर एक वर्ष घरी बसले होते. मला मिर्झापूर मिळायला दहा वर्षे लागली, असेही ईशाने सांगितले.

संयम राखणे आवश्यक

मिर्झापूर 2 मध्ये माधुरी भाभीला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. पण धक्कादायक बाब म्हणजे यानंतर ईशाकडे कोणतेही काम नव्हते. (सर्व फोटो - Isha Talwar/Instagram)

VIEW ALL

Read Next Story