आपल्या प्रत्येकाच्या स्वंयपाकघरात माचिसचा वापर केला जातो.
बाजारात लायटर येण्यापूर्वी स्टोव्ह, गॅस पेटवण्यासाठी लोकं काडेपेटीचा वापर करत होते.
ब्रिटिश शास्त्रज्ञानं काड्यापेटीचा शोध लावला. या घटनेला तब्बल 191 वर्षं झाली आहेत.
पूर्वी चूल, स्टोव्ह पेटवण्यासाठी चकमकीची दगडं म्हणजे गारगोट्या वापरायचे. त्यातून मार्ग काढण्यासाठी काडेपेटीचा शोध लागला
केरळातल्या कोचिमध्येही काडेपेटी बनवण्याचे कारखाने आहेत. हजारो लोकांचं पोट या उद्योगावर अवलंबून आहे
वार्षिक तब्बल दीड हजार कोटींची उलाढाल असलेल्या या उद्योगात आता मोठी घट झालीय. माचीस बनवणारे 8 हजार कारखाने बंद पडलेत.
पण तुम्हाला माहित आहे का हिंदीत माचिसला काय म्हणतात. माचिसला हिंदीत दियासलई असं म्हटलं जातं.