गर्मीमध्ये मोठ्या प्रमाणात एसीचा वापर केला जातो.परंतु एसीचा सतत वापर केल्याने सिक बिल्डिंग सिंड्रोम होऊ शकतो हे तुम्हाला माहित आहे का?
रूम थंड करण्यासाठी आपण बऱ्याचवेळा एसीचा वापर करत असतो. पण त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. पायोज पांडे यांच्या मते एसी रूम किंवा ऑफिसमध्ये सतत बसून सिक बिल्डिंग सिंड्रोम संबंधी आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
या सिंड्रोममुळे डोळे,घसा आणि त्वचेचा कोरडेपणा यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
त्याचबरोबर यामुळे वातानुकूलित वातावरणामध्ये खराब हवेमुळे श्वसनाच्या समस्या वाढू शकतात. तसच एसीच्या वापरामुळे डोळे आणि हृदयासारख्या अवयवांना इजा होण्याची शक्यता असते.
एसबीएसचा धोका कमी करण्यासाठी दिवसभर हायड्रेटेड राहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जास्तीतजास्त पाणी प्या.
घरातील कुंडीमध्ये झाडे लावा.ज्यामुळेप हवा शुद्ध होते आणि झाड कार्बनडायऑक्साइड शोषून घेतात त्यामुळे खोलीतील हवेची गुणवत्ता चांगली राहते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)