Friendship Day 2023

'या' अनोख्या पद्धतीने साजरा करा मैत्रीचा दिवस

Aug 02,2023


येत्या रविवारी म्हणजे 6 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येणार आहे. रक्ताचं नातं नसलं तरी आयुष्यातील हे हृदयाचं नांत ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.


भारतासोबतच बांगलादेश, मलेशिया, ऑस्ट्रेलियामध्ये हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. जगातील सर्वात मौल्यवान नातं साजरा करण्यासाठी या आयडिया तुम्ही वापरु शकता.

ब्रेसलेट

तुमच्या फ्रेंडसाठी खास घरी ब्रेसलेट तयार करु शकता. यासाठी तुम्ही ऑनलाइन व्हिडीओची मदत घेऊन शकता.

चित्रपट मॅरेथॉन

तुम्ही या दिवशी खास फ्रेंडशीपवरील किंवा तुमच्या आवडच्या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. घरातमस्ते स्वादिष्ट स्नॅक्स आणि पेयांसोबत हा दिवस साजरा करा.

सहल

तुम्ही वनडे ट्रीपला देखील जाऊ शकता. शनिवारी रविवार असा छान निसर्गाच्या सान्निध्यात मैत्रीचं हे नातं साजरा करु शकता.

खरेदी

तुमच्या फ्रेंडला जर शॉपिंगची आवड असले तर तुम्ही कपडे, पुस्तकं इत्यादीची खरेदी करुन आनंदी हा दिवस साजरा करु शकता.

रात्री डिनर

खरं तर तुम्ही जेव्हा शक्य आहे तेव्हा दुपारी किंवा रात्री छान आवडीच्या ठिकाणी डिनरला जाऊ शकता.

खास व्हिडीओ बनवा

तुमची मैत्री झाल्यापासूनचे आतापर्यंतचे फोटोंचा एक मस्त मैत्रीच्या गाण्यावर व्हिडीओ बनवा.

गेमिंग झोन

जर तुम्हाला आणि तुमच्या फ्रेंडला गेमिंगची आवडत असेल तर तुम्ही तो दिवस गेमिंग झोनमध्ये जाऊन साजरा करु शकता.

VIEW ALL

Read Next Story