अस्थमाच्या रुग्णांना 'मछली प्रसादम'च्या माध्यमातून बरं करण्याचा दावा करणारे बाथिनी हरिनाथ गौड यांचं निधन झालं आहे.
बाथिनी हरिनाथ गौड हे 84 वर्षांचे होते. मागील बऱ्याच काळापासून ते आजारी होते.
बाथिनी हरिनाथ गौड यांच्या कुटुंबियांनी महाराजांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
बाथिनी हरिनाथ गौड यांचं संपूर्ण कुटुंब हैदराबादमध्ये अस्थमा रुग्णांना लोकप्रिय 'मछली प्रसादम'ची व्यवस्था करायचे.
बाथिनी हरिनाथ गौड यांच्याकडून वाटप केलं जाणारं हे विशेष औषध मुरेल मासा आणि औषधी वनस्पतींपासून बनवलं जातं. यासाठी मासे रुग्णच घेऊन येतात.
बुधवारी रात्री बाथिनी हरिनाथ गौड यांचं निधन झाल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं.
बाथिनी हरिनाथ गौड यांच्या मागे पत्नी, 2 मुलं आणि 2 मुली असं कुटुंब आहे.
बाथिनी हरिनाथ गौड यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे.
बाथिनी कुटुंब मागील 100 वर्षांहून अधिक काळापासून 'मृगशिरा कार्थी'च्या मुहूर्तावर 'मछली प्रसादम' नावाचं प्रसिद्ध औषध अस्थमा झालेल्या रुग्णांना मोफत वाटतं.
'मछली प्रसादम' हे औषध बाथिनी कुटुंबातील वयस्कर व्यक्तीने शोधून काढल्याचा दावा केला जातो.
मागील अनेक पिढ्यांपासून बाथिनी हरिनाथ गौड यांचं कुटुंब या औषधाचं वाटप करतं.