'मछली प्रसादम' वाटप करणाऱ्याचा गौड यांचं निधन

अस्थमाच्या रुग्णांना 'मछली प्रसादम'च्या माध्यमातून बरं करण्याचा दावा करणारे बाथिनी हरिनाथ गौड यांचं निधन झालं आहे.

बऱ्याच काळापासून होते आजारी

बाथिनी हरिनाथ गौड हे 84 वर्षांचे होते. मागील बऱ्याच काळापासून ते आजारी होते.

वृत्ताला दुजोरा दिला

बाथिनी हरिनाथ गौड यांच्या कुटुंबियांनी महाराजांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

'मछली प्रसादम'ची व्यवस्था करतं कुटुंब

बाथिनी हरिनाथ गौड यांचं संपूर्ण कुटुंब हैदराबादमध्ये अस्थमा रुग्णांना लोकप्रिय 'मछली प्रसादम'ची व्यवस्था करायचे.

मासा आणि वनस्पतीपासून बनवलेलं औषध

बाथिनी हरिनाथ गौड यांच्याकडून वाटप केलं जाणारं हे विशेष औषध मुरेल मासा आणि औषधी वनस्पतींपासून बनवलं जातं. यासाठी मासे रुग्णच घेऊन येतात.

बुधवारी रात्री झालं निधन

बुधवारी रात्री बाथिनी हरिनाथ गौड यांचं निधन झाल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं.

पत्नी आणि चार मुलं असा परिवार

बाथिनी हरिनाथ गौड यांच्या मागे पत्नी, 2 मुलं आणि 2 मुली असं कुटुंब आहे.

25 ऑगस्टला अंत्यसंस्कार

बाथिनी हरिनाथ गौड यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे.

मोफत औषध वाटप

बाथिनी कुटुंब मागील 100 वर्षांहून अधिक काळापासून 'मृगशिरा कार्थी'च्या मुहूर्तावर 'मछली प्रसादम' नावाचं प्रसिद्ध औषध अस्थमा झालेल्या रुग्णांना मोफत वाटतं.

वयस्कर व्यक्तीने शोधून काढलं औषध

'मछली प्रसादम' हे औषध बाथिनी कुटुंबातील वयस्कर व्यक्तीने शोधून काढल्याचा दावा केला जातो.

अनेक पिढ्यांपासून करतात वाटप

मागील अनेक पिढ्यांपासून बाथिनी हरिनाथ गौड यांचं कुटुंब या औषधाचं वाटप करतं.

VIEW ALL

Read Next Story