Voter ID वरील पत्ता बदलायचा आहे? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

सुरुवातीला www.nvsp.in या वेबसाईटवर भेट देणे गरजेचे आहे आणि त्यासाठी नेशनल वोटर्स सर्विस पोर्टलचा उपयोग करा.

जर तुम्ही तुमचे घर बदलले आहे आणि अशा वेळी दुसऱ्या निवडणूक क्षेत्रामध्ये राहायला गेला असाल तर अशा वेळी फॉर्म नंबर 6 आपल्याला भरायचा आहे . यासाठी Apply online for new voter registration/due to relocation from AC” सेक्शन मध्ये जाऊन क्लिक करायचे आहे.

जर तुम्ही एकाच वार्ड मध्ये आहात परंतु दुसरीकडे शिफ्ट झाला असेल तर अशावेळी तुम्हाला फॉर्म नंबर 8A वर क्लिक करून तो फॉर्म भरायचा आहे. या फार्ममध्ये आवश्यक असलेली संपूर्ण माहिती न चुकता भरायला हवी.

जसे की आपले नाव जन्म तारीख राज्य क्षेत्र विधानसभा किंवा लोकसभा क्षेत्र तसेच सध्याचा पत्ता किंवा पर्याय म्हणून तुम्ही तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर इत्यादी वैयक्तिक माहिती तुम्हाला या फॉर्ममध्ये भरायची आहे.

तुमचा फोटोग्राफ, पत्त्याचा पुरावा आणि वयाचा दाखला इत्यादी सगळे कागदपत्र तुम्हाला या साईटवर अपलोड करायचे आहेत सोबतच कागदपत्र अपलोड केल्यानंतर हा फॉर्म ऑनलाइन तुम्हाला सबमिट करायचा आहे, एवढे केल्यानंतर तुम्हाला आता एक कॅपचा नंबर येईल तो नंबर तुम्हाला व्यवस्थित पाहून टाईप करायचा आहे आणि तिथे दिलेला डिक्लेरेशन ऑप्शन व्यवस्थितरित्या भरायचा आहे.

तुम्ही जी काही माहिती या फॉर्ममध्ये भरलेली आहे ती माहिती व्यवस्थित रित्या तपासून पहा आणि त्यानंतरच सबमिट बटन वर क्लिक करा.

यासोबतच तुम्हाला एक आवेदन पत्र म्हणजेच विनंती अर्ज जमा करावे लागेल जेणेकरून तुमचे तुमचा पत्ता बदलून जाईल आणि हा पत्ता तुम्हाला ईमेल च्या माध्यमातून एक मॅसेज येईल जर आवेदनपत्रामध्ये मोबाईल नंबर दिला असेल तर दिला गेलेला मोबाईल नंबर वर सुद्धा तुम्हाला तुमचा पत्ता बदलला आहे असा एक मॅसेज सुद्धा येईल.

VIEW ALL

Read Next Story