ठरलं! 'या' तारखेला लाँच होणार Tata Punch इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त...

देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आपली चौथी इलेक्ट्रिक कार Tata Punch EV लाँच करत आहेत. याची अधिकृत बुकिंग सुरु झाली आहे.

ग्राहक कंपनीची अधिकृत वेबसाईट आणि अधिकृत डीलरशीपच्या माध्यमातून 21 हजारांच्या टोकन अमाऊंटवर कार बूक करु शकतात.

कंपनी 17 जानेवारीला अधिकृतपणे कार लाँच करत असून, त्यानंतर तिची रेंज आणि किंमत यांची घोषणा होईल.

टाटा मोटर्सने कारला नव्या ईव्ही तंत्रज्ञानावर तयार केलं आहे. यात अनेक बॅटरी पॅक आणि ड्रायव्हिंग रेंजची सुविधा मिळते.

Tata Punch EV ला एसयुव्ही लाँग रेंज आणि स्टँटर्ड रेंज व्हेरियंटमध्ये सादर केलं आहे.

कंपनी या एसयुव्हीसह 3.3 kW च्या क्षमतेचा वॉलबॉक्स चार्जर देत आहे. यात सनरुफचाही पर्याय आहे.

स्मार्ट व्हेरियंट

स्मार्ट व्हेरियंटमध्ये कंपनी एलईडी हेडलॅम्प्स, स्मार्ट डिजिटल डीआरएल, मल्टी मोड रिजन इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम आणि 6 एअरबॅग देत आहे.

अॅडव्हेंचर व्हेरियंट

अॅडव्हेंचर व्हेरियंटमध्ये स्मार्टशिवाय कॉर्नरिंगसह फ्रंट फॉग लॅम्प, इंफोटेनमेंट सिस्टम, ऑटोहोल्डसह ईपीबी, सनरुफ असे फिचर्स मिळतात.

Empowered व्हेरियंट

Empowered व्हेरियंटमध्ये 16 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील, AQI डिस्प्लेसह एअर प्युरिफायर, ऑटो फोल्ड ORVM, 17.78 सेमी डिजिटल डिस्प्ले, SOS फंक्शन, 26.03 सेमी इंफोटेंमेंट सिस्टम, ड्युअल टोन बॉडी असे फिचर्स आहेत.

Empowered + व्हेरियंट

Empowered + व्हेरियंटमध्ये लेदर सीट्स, 360 डिग्री कॅमेरा, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस फोन चार्जर, 26.03 सेमीचं डिजिटल कॉकपिट असे फिचर्स मिळतात.

लाँच होण्याआधी किंमतीबद्दल सांगणं थोडं कठीण आहे. पण तज्ज्ञांच्या मते 12 लाखापर्यंत किंमत असू शकते.

VIEW ALL

Read Next Story