या जगात भीतीला जागा नाही. इथे फक्त शक्ती शक्तीचा आदर करते.

जर एखाद्या देशाला भ्रष्टाचारमुक्त करायचा असेल तर मला असे वाटते की आपल्या समाजात असे ३ लोक आहेत जे ते करू शकतात. हे तीनजण म्हणजे वडील, आई आणि शिक्षक आहेत.

जेव्हा आपल्याला अडथळ्यांचा सामना करावा लागतो तेव्हा आपल्याला समजते की आपल्यामध्ये धैर्य आणि लवचिकता आहे, ज्याची आपल्याला स्वतःला जाणीव नव्हती आणि जेव्हा आपण अपयशी होतो तेव्हाच ते समोर येते. आपण त्यांना शोधून जीवनात यशस्वी झाले पाहिजे.

वेगळा विचार करण्याचे धाडस करा, शोध लावण्याचे धाडस करा, अज्ञात मार्गावर चालण्याचे धाडस करा, अशक्य गोष्टी शोधण्याचे धाडस करा आणि समस्यांवर विजय मिळवा आणि यशस्वी व्हा. हे उत्कृष्ट गुण आहेत ज्यासाठी आपण कार्य केले पाहिजे.

आपल्या सर्वांमध्ये समान प्रतिभा नसेल पण आपल्या सर्वाना आपली प्रतिभा विकसित करण्याची समान संधी आहे.

यशस्वी होण्याची इच्छाशक्ती मजबूत असेल तर अपयश आपल्याला दबवू शकत नाही.

सर्जनशीलता म्हणजे एकाच गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार करणे.

कोणत्याही प्रयत्नात अयशस्वी झालात तर प्रयत्न करणे थांबवू नका कारण FAIL म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग.

जर तुम्हाला तुमच्या मिशनमध्ये यश मिळवायचे असेल तर फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा.

पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका. कारण, दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अपयशी ठरलात तर सगळे म्हणतील की तुम्हाला पहिले यश नशिबाने मिळाले.

VIEW ALL

Read Next Story