तळमजल्यावरील खोल्यांमधूने चोरणे आणि पळून जाणे चोरांसाठी सोपं आहे. तसेच वरच्या मजल्यावर चोरी करून सामानासह निघून गेल्यावर पकडले जाण्याची भीती आहे. त्यामुळे ते अनेकदा वर चढणे टाळतात. त्यामुळे त्या खोल्या सहसा सुरक्षित राहतात.
पहिला-दुसरा-तिसरा मजला का सुरुक्षित आहे?
त्यामुळे तुमची सुरक्षितता लक्षात घेता दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर खोल्या घेणं चांगले. कारण इथून बाहेर निघण्याची संभाव्यता जास्त आहे.
अशा परिस्थितीत, जर तुम्ही चौथ्या मजल्यावर खोली बुक केली आणि अचानक आग लागली, तर तुम्ही त्यात अडकू शकता. अशा परिस्थितीत पायऱ्यांवरून खाली उतरायचे असेल तर तेही सहज शक्य नाही.
लॉयड फिगिन्सच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही हॉटेलमध्ये रूम बुक करत असाल, तर ती चौथ्या मजल्यावर करु नका, कारण बहुतेक हॉटेल्समध्ये सुरक्षा आणि सुरक्षेबाबत निष्काळजीपणा दिसून आला आहे. विशेषत: अग्निसुरक्षेच्या संदर्भात.
लॉयड फिगिन्स हे माजी सैनिक आहेत आणि आता प्रवासी जोखीम तज्ञ म्हणून काम करतात. त्यांनी अनेक देशांचा प्रवास केला आहे. यादरम्यान, त्याने विविध देशांच्या हॉटेल्समधील सुरक्षेचे बारकाईने निरीक्षण केले आहे.
परंतु आज आम्ही तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगणार आहोत, ज्याला लक्षात घेऊन तुम्ही हॉटेलचं रुम बुक केलं पाहिजे.
आपण कुठेही फिरायला गेलो की, हॉटेलमध्ये राहातो. परंतु येथे राहायला जाताना आपण त्यासंदर्भात अनेक गोष्टी इंटरनेटवर चेक करतो. त्यांपैकी सर्वात महत्वाचं आहे, ते म्हणजे पैसे. त्यानंतर लोक हॉटेलचे रुम, एमिनिटीज, हॉटेलचं लोकेशन आणि सेवा पाहून हॉटेल बुक करतात.