जाणून आश्चर्य वाटेल, पण कैक हजार फूट उंचीवर आकाशात उडणाऱ्या विमानांमध्येही हॉर्न असतात.
विमान हवेत उडतं मग तिथं कशाला हवा हॉर्न? तुम्हालाही प्रश्न पडला ना? यामागेही आहे एक खास कारण.
कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीमध्ये ग्राऊंड स्टाफला माहिती देण्यासाठी, सतर्क करण्यासाठी म्हणून विमानात हॉर्न असतो.
जो हॉर्न ग्राऊंड स्टाफला सतर्क करतो त्याच हॉर्नच्या माध्यमातून विमान धावपट्टीवरून आकाशात झेपावण्यासाठी तयार आहे याचा इशाराही दिला जातो.
उड्डाणापूर्वी विमानात काही बिघाड झाल्यास हॉर्न वाजवूनच ग्राऊंड स्टाफला याची माहिती दिली जाते.
विमानात काही हॉर्न स्वयंचलित असतात जे आग लागल्यास किंवा विमानात बिघाड झाल्यास वाजतात. त्यांना ग्राऊंड कॉल बटन असंही म्हणतात.