भारताचा स्टार क्रिकेटर रिंकू सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
समाजवादी पार्टीची खासदार प्रिया सरोज हिच्याशी त्याचं लग्न ठरलंय. त्यामुळे या दोघांबाबत बऱ्याच गोष्टी लोक इंटरनेटवर सर्च करत आहेत.
केकेआर आणि टीम इंडियाचा स्टार फलंदाज असणारा रिंकू सिंहचा जन्म हा 12 ऑक्टोबर 1997 मध्ये अलीगढ येथे झाला.
कुटुंबाची आर्थिक स्थिती बरी नसल्याने रिंकू सिंह जास्त शिकू शकला नाही. त्याच शिक्षण आठवी पर्यंतच होऊ शकलं आणि नववीमध्ये नापास झाल्यावर रिंकूने शिक्षण सोडून दिलं.
रिंकू सिंहची होणारी पत्नी प्रिया सरोज ही 25 वर्षांची असून ती समाजवादी पक्षाकडून लोकसभेला खासदार म्हणून निवडून आली.
25 वर्षीय प्रिया सरोजचा जन्म वाराणसी येथे झाला असून तिने दिल्ली युनिव्हर्सिटीमधून पदवी पर्याप्त केली. त्यानंतर तिने नोएडा येथून LLB चे शिक्षण देखील घेतले.