अनेक वेळा पुरुषांच्या शर्टवर पान किंवा गुटख्याचे डाग पडतात. ते काढणे खूप कठीण होते.
या डागांमुळे कपडे निरुपयोगी होतात. डाग पडलेले कापड अनेक वेळा धुतल्यानंतरही डाग निघत नाही.
तुम्ही आंबट दह्याने हे डाग दूर करू शकता. आंबट दही सुमारे 10 मिनिटे चोळल्याने गुटख्याचे डाग सहज निघून जातात.
खोल आणि घट्ट डाग काढून टाकण्यासाठी कोमट पाण्यात कपडे धुणे फायदेशीर ठरते.
कपड्यांवर चहा-कॉफी पडली असेल आणि त्याचे डाग काढायचे असतील, तर कपडे कोमट पाण्यात साबण आणि डिटर्जंट पावडरने स्वच्छ करावेत.
असे केल्याने डाग निघून जातात. कापड थोडावेळ कोमट पाण्यात भिजवावे लागेल.
किचनमध्ये वापरल्या जाणार्या मीठ आणि लिंबूने कपड्यांवरील ग्रीसचे डाग सहज काढता येतात.
लिंबू मीठ वापरल्याने फारसा परिणाम होत नसेल, तर मीठात अल्कोहोल टाकूनही तुम्ही कपडे स्वच्छ करू शकता.