घरातील सिलिंक फॅन खूप उंचावर असतो. त्यामुळे त्याची स्वच्छता करणे खूप कठीण वाटते.
सिलिंक फॅनची स्वच्छता करताना घाण पूर्ण घरात पसरते. यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
दिवाळीआधी फॅन साफ करण्यासाठी पुढे दिलेल्या ट्रीक वापरा. यामुळे फॅन लख्ख दिसेल.
यासाठी तुम्हाला एक स्प्रे बॉटल, लिक्विड क्लिनर आणि उशीचे कव्हर लागेल.
सिलिंक फॅन स्वच्छ करण्यासाठी टेबल किंवा शिडीची मदत घ्या.
उशीचे कव्हर पंख्याच्या वर पसरवून ठेवा. यामुळे धूळ खाली पडणार नाही.
यानंतर पंख्याचे ब्लेड कव्हरच्या आत घुसवा आणि काळजीपूर्वक पुसा.
धुळ गेल्यावर लिक्विड स्पे करा आणि स्वच्छ कपड्याने पुसा.
आता सिलिंक फॅन नवा असल्याप्रमाणे चमकेल आणि हवादेखील जास्त देईल.