Chanakya Niti: एखाद्या स्त्रीचे वर्तन शोधायचे असेल तर काय करावे लागेल याची माहिती चाणाक्य नीतीमध्ये देण्यात आली आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रीया जास्त भावूक असतात, असे चाणाक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे.
पण काही महिला खूपच भावूक असतात. इमोशलन आणि प्रॅक्टीकल अशा दोन्ही प्रकारच्या महिलांचा स्वभाव त्यांच्या वर्तनाकडे पाहून कळतो, असे चाणाक्य नीतीमध्ये म्हटले आहे.
ज्या स्त्रिया लवकर भावनिक होतात त्यांच्यातही गुण असतात. ज्यांच्याबद्दल तुम्हाला फारच कमी माहिती असेल पण आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहोत.
आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, ज्या स्त्रिया लवकर भावुक होतात त्या घरासाठी खूप शुभ असतात. इतकंच नव्हे तर चाणक्य नीतीने प्रत्येक मुद्द्यावर भावूक होणाऱ्या महिलांबद्दल आणि त्यांच्या आंतरिक वैशिष्ट्यांबद्दलही तपशीलवार माहिती दिली आहे.
चाणक्य नीतीमध्ये लिहिलेल्या गोष्टी शतकानुशतके जुन्या असल्या तरी त्या आजच्या काळातही लागू होतात. महिलांनी भावनाप्रधान असल्याचे काय फायदे आहेत, याबद्दल आचार्य चाणाक्य काय म्हणतात ते जाणून घेऊया.
चाणक्य नीतीनुसार, ज्या महिला लवकर भावूक होतात त्या कोणाचाही जास्त विचार करत नाहीत आणि त्यांचे हृदय अगदी निर्मळ असते. अशा महिला त्यांच्या मनात साठवून ठेवलेल्या गोष्टी, कटुता आणि राग व्यक्त करतात.
त्यामुळे महिला कोणतीही गोष्ट मनाला लावून घेत नाही. अशा महिला स्वभावाने अतिशय शांत असतात आणि आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन जातात.
आचार्य चाणक्य म्हणतात की ज्या स्त्रिया लवकर भावनिक होतात त्यांना शिस्तीत राहायला आवडते. तसेच त्या कायदा आणि नियमांचे पालन करतात. अशा महिला स्वतः यशाच्या पायऱ्या चढतात आणि इतरांसाठीही उदाहरण बनतात.
आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या स्त्रिया खूप भावूक असतात त्याही धार्मिक स्वभावाच्या असतात. धार्मिक कार्य केल्यामुळे अशा महिलांचे मन खूप शांत आणि आरामदायी असते. यामुळे अशा महिला इतरांबद्दल वाईट विचार करत नाहीत तर त्यांच्या आयुष्यात आनंदी राहतात.
ज्या महिला खूप भावूक असतात, त्या राग आल्यावर रडू लागतात. तसेच भावनिक झाल्यावर देखील रडू लागतात. अशा स्त्रियाही मनाने अतिशय स्वच्छ असतात. त्याचबरोबर त्या कोणाशीही शत्रुत्व ठेवत नाहीत.