2023 वर्षातला शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर महिना सुरु झाला आहे. काही आर्थिक कामं पूर्ण करण्यासाठी ही शेवटची संधी आहे.

31 डिसेंबरपर्यंत UPI संबंधीत कामं पूर्ण करा. NPCI च्या आवाहनानुसार Google Pay, Paytm, PhonePe सारखी पेमेंट अॅपमधून एक वर्षापासून सक्रिय नसलेले नंबर काढून टाकले जाणार आहेत.

UIDAI नुसार गेल्या 10 वर्षात आधाराकार्डात कोणतंही अपडेट केलं नसेल, तर 14 डिसेंबर ही मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी आहे.

म्युच्यअर फंड आणि डिमॅट अकाऊंटमध्ये 31 डिसेंबरपर्यंत नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. असं न केल्यास तुमचं पोर्टफोलिओ फ्रीज केलं जाईल

आरबीएच्या नियमानुसार एखाद्या बँकेत लॉकर अॅग्रीमेंट असेल तर ते अपडेट करावं लागणार आहे. यानुसार नवा करार करावा लागणार आहे.

SBI च्या अमृत कलश योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीक आहे. या योजनेत 400 दिवसांच्या एफडीवर 7.10 टक्के व्याज मिळणार आहे.

31 डिसेंबरपर्यत ही कामं पूर्ण न केल्यास आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

VIEW ALL

Read Next Story