अनेकांना आपल्या इंग्रजीबद्दल न्यूनगंड असतो.
मला इंग्रजी येत नाही मग कोणी नोकरीदेखील देणार नाही, असे अनेकांना वाटते.
इंग्रजी येत नसेल तरी तुम्ही या 5 फिल्डमध्ये करिअर करुन चांगली कमाई करु शकता.
प्रोफेशनल अँथलिट बनून तुम्ही करिअर करु शकता. यासाठी तुम्हाला फिटनेस आणि खेळाकडे लक्ष द्यावे लागेल.
सिव्हिल इंजिनीअर बनून तुम्ही बिल्डिंगचे डिझाइन बनवणे, स्ट्रक्चर पाहणे अशी कामे करता. इंग्रजी न येता देखील ही कामे तुम्ही करु शकता.
चांगल्या शेफचे स्किल त्याच्या हातात असते. या क्षेत्रात करिअर करुन चांगली कमाईदेखील करु शकता.
ग्राफीक डिझायनरसाठी क्रिएटीव्हीटी, डिझाइन सॉफ्टवेअर आणि कम्युनिकेशन स्किल असणे आवश्यक आहे. क्रिएटीव्ह विचार असलेल्यांचे यात चांगले करिअर होते.
गाणं गायला आवडत असेल, वाद्य वाजवायला आवडत असेल तर यातदेखील करिअर करु शकता.
या क्षेत्रात करिअर बनवण्यासाठी तुमचे इंग्रजी खूप चांगले असावे, असे नाही.