चहाचा रंग देतो धोक्याचे संकेत? पण ओळखायचं कसं?

Aug 19,2024

डोकेदुखी असो किंवा मूड फ्रेश करण्यासाठी एक चहा पुरेसा असतो. लोक सकाळी उठल्यानंतर किंवा ताजेतवानं होण्यासाठी चहाचं सेवन करतात.

पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जी चहा पित आहात ती बनावटही असू शकते.

नुकतचं ओडिशामधील कटक येथे चहाची बनावट कंपनी आढळली आहे. येथे मोठ्या प्रमाणावर बनावट चहा पावडर तयार केली जात होती. आणि देशभर पुरवठा केला जात होता.

अशा परिस्थितीत बनावट चहा पावडर आणि त्यापासून होणारा चहा नेमका ओळखायचा कसा हे जाणून घ्या.

चांगल्या दर्जाच्या चहा पावडरचा आकार, रंग सारखाच असतो. शुद्ध चहा पावडर खासकरुन मोठ्या तुकड्यांमध्ये असते.

बनावट चहापत्ती तुटलेली असू शकते. तसंच त्यावर कृत्रिम रंग लावलेला असू शकतो.

शुद्ध चहा नेहमीच चवीला चांगला असतो. पण बनावट चहा पावडर वापरलेल्या चहाची चव कडू असते.

शुद्ध चहा कपममध्ये चहा पावडरच्या खुणा सोडत नाही.

जर चहा तयार केल्यानंतर त्याचा रंग नैसर्गिक वाटत नसेल तर त्यात भेसळ झाली आहे असं समजा.

तसंच तुम्ही चहापत्ती पाण्यात मिसळू शकता. जर त्या पाण्यात मिसळल्या तर बनावट आहे.

VIEW ALL

Read Next Story