रामलल्लाचं रुपडं पालटलं, नव्या रुपातही दिसतोय तितकाच गोड
प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्लाचं रुप अनेकांनाच भारावून गेलं. बनारसी पंचा, सुरेख अशी सुवर्ण आणि हिरेजडित आभूषणं असा साज रामलल्लांनी केला होता.
प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली आणि अनेकांच्याच आनंदाला पारावार उरला नाही.
तब्बल 500 वर्षांनंतर राम जन्मभूमीवर भव्य मंदिराची उभारणी होऊन त्यामध्ये साक्षात प्रभू श्रीराम विराजमान झाल्यामुळं अनेकांच्याच डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.
अशा या रामलल्लाचं नवं रुप, त्याचा नवा साज नुकताच सर्वांसमोर आला आहे.
मंदिर प्रतिष्ठानच्या वतीनं नुकतेच रामलल्लाचे नव्या रुपातील फोटो शेअर केले आहेत. इथं हिरव्या आणि गुलाबी रंगांचं वस्त्र देवाचं रुप आणखी उठावदार करून जात आहेत.
गळ्यामध्ये शेला, शिरस्थानी असणारा मुकूट आणि साजिरं सुंदर रुप पाहताना पुन्हा एकदा रामलल्ला सर्वांनाच भारावून सोडत आहे.