Apple ने त्यांच्या सर्व स्मार्टफोन्सची किंमत कमी केली आहे. कंपनीने iPhone 15 सीरीज ते iPhone SEपर्यंत फोनच्या किंमती कमी केल्या आहेत
कंपनीने त्यांच्या प्रो मॉडल्सच्या किंमती कमी केल्या आहेत. iPhone 15 Pro आणि iPhone Pro Maxच्या किंमती कमी झाल्या आहेत.
iPhone 15 Pro Maxची किंमत कंपनीने 5900 रुपयांनी कमी केली आहे. हा फोन 1,59,900 रुपयांपर्यंत विक्री केला जात होता. आता या फोनची किंमत 1,54,000 रुपये आहे.
iPhone 15 Proबद्दल सांगायचं झालं तर, स्मार्टफोन 1,34,900 रुपयांना विक्री केला जात होता. आता तुम्ही 1,29,800 रुपयांत खरेदी करु शकता.
स्मार्टफोनच्या या नव्या किंमती अॅपलच्या वेबसाइटवर लाइव्ह झाल्या आहेत. फोनवरील कस्टम ड्युटी कमी केल्यानंतर फोन स्वस्त झाले आहेत.
सरकारने स्मार्टफोनवर इंपोर्ट ड्युटी 20 ते 15 टक्क्यांनी कमी केली आहे. मात्र, अॅपलने अद्यापही अधिकृतरित्या किंमती का कमी केल्या हे सांगितले नाही.
सरकारने मोबाइल फोनच्या अनेक भागांवरील कस्टम ड्युटी कमी केली आहे. PCB आणि चार्जरसारख्या पार्टसवर बेसिक कस्टम ड्युटी कमी केली आहे.