नासानं आतापर्यंत अनेकदा अवकाशातील कमाल घडामोडी आणि ताऱ्यांच्या हालचाली जगासमोर आणल्या आहेत. याच नासानं भारताची काही सुरेख छायाचित्रही दरम्यानच्या काळात शेअर केली आहेत.
दिवाळीदरम्यान भारताचं रुप काहीसं असं दिसतं, नासानं टीपलेला हा फोटो कसा वाटला?
मार्च 2000 मध्ये नासानं भारतातील हुगळी नदीपात्राचं टीपलेलं हे छायाचित्र.
2004 मध्ये राजस्थानमधील सांभर तलावाचं हे छायाचित्र नासानं टीपलं होतं. हा देशातील सर्वात मोठा खाऱ्या पाण्याचा तलाव आहे.
भारत आणि भारतीय सीमाभागाची सुरेख छायाचित्र नासानं आजवर शेअर केली असून, कधीही न पाहिलेली झलक जगापुढे आणली.
अवकाशातून टीपलेली रामसेतूची झलक. नासानं याला पाल्क स्ट्रेट असं नाव दिलं आहे.