कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडू पांढरे कपडेच का वापरतात?

उच्चभ्रू खेळ

19 व्या शतकापासून कसोटी क्रिकेटमध्ये पेहरावासाठीचा हा नियम लागू झाला आहे. गतकाळात क्रिकेट हा एक आदर्श आणि उच्चभ्रू खेळ गणला जात होता.

पांढरा रंग

दिवसा, सूर्यप्रकाशात खेळवल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यांसाठी पांढरा रंग अतिशय योग्य ठरत होता.

पांढरा पेहराव

पांढरा पेहराव शुद्धता आणि परंपरेसह खिलाडूवृत्तीला अधोरेखित करत होता.

सूर्यकिरणं

आणखी एक कारण म्हणजे पांढरा रंग उष्णता आणि सूर्यकिरणांना परावर्तित करतो, ज्यामुळं खेळाडूंना थंडावा मिळतो.

योग्य पर्याय

कसोटी सामने पाच दिवस खेळवले जातात, ज्यामुळं पांढरे कपडे या सामन्यांसाठी अतिशय योग्य ठरतात.

चेंडू सहजपणे हेरता येतो

कसोटी क्रिकेट लाल रंगाच्या चेंडूनं खेळला जातो. परिणामी इथं पांढरे कपडे वापरात असल्यामुळं चेंडू क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंनाही सहजपणे दिसू शकतो.

VIEW ALL

Read Next Story