भारतात समलैंगिक जोडप्याला मान्यता असली तरीही समलैंगिक विवाहाला कोर्टाकडून मान्यता मिळालेली नाही.
पण भारतात असं एक गाव आहे जिथे दोन मुलांचं लग्नं लावलं जातं.
ही अनोखी प्रथा राजस्थान येथील बडोदिया गावची आहे.
दोन लहान मुलांनाच वर-वधू बनवून त्यांचं लग्न लावलं जातं.
होळीच्या आदल्या रात्री हे लग्न पार पडतं.
दुसऱ्या दिवशी त्यांना बैलगाडीत बसवून पूर्ण गावात त्यांची मिरवणूक काढली जाते.
या आगळ्यावेगळ्या लग्नात गावातील सर्व लोक सामील होतात.
खूप वर्षांपासून हे गाव दोन भागांत विभागलं गेलेलं.
त्यानंतर दोन्ही गावांमध्ये प्रेम टिकून राहण्यासाठी ही अनोखी पद्धत सुरू झाली.