ऑस्कर नामांकन मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट'मदर इंडिया'.या सिनेमात नर्गिस, सुनील दत्त, राजेंद्र कुमार, राज कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८ कोटींचा गल्ला जमवला होता.
बॉलिवूडमधील ऐतिहासिक चित्रपट म्हणजे 'मुघल-ए-आझम'. के. आसिफ यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. चित्रपटात पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे, दिलीप कुमार व मधुबाला हे प्रमुख भूमिकेत होते. १.५ कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने 11 कोटीं कमवले होते.
2005 च्या तमिळ चित्रपटाचा रिमेक असलेला अमीर खानच्या गजनी चित्रपटाने तब्बल १६२ कोटी रुपये कमवून गदरचा रेकॉर्ड मोडला.
राजकुमार हिरानीने दिग्दर्शित केलेल्या ३ इडियट्सने 281 कोटी रुपये कमवले, गजनी चा रेकोर्ड मोडून लगेच २००९ मध्ये अमीर खानने नवा इतिहास रचला.
चेन्नई एक्सप्रेस नंतर अमीर खान आणि अभिषेक बचनच्या धूम ३ या चित्रपटाने त्याच वर्षी ३७२ कोटी रुपये कमवले.
अमीर खानने pkया चित्रपटातून स्वतःचाच रेकॉर्ड ब्रेक केला, राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटाने एकूण ५०७ कोटी रुपये कमवले.