जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये शहीद झालेल्या कर्नल मनप्रीत सिंग यांना आज शेवटचा निरोप देण्यात आला.
Sep 15,2023
शहीद कर्नल मनप्रीत सिंग यांचं पार्थिव त्यांच्या मोहाली येथील घऱी पोहोचताच त्याच्या 6 वर्षीय मुलाने त्यांना सॅल्यूट केला.
यावेळी शहीद मनप्रीत सिंग यांचा मुलगा लष्कराच्या वर्दीत होता. चिमुरड्याने आपल्या वडिलांना सॅल्यूट करताच उपस्थित जमावाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते.
शहीद मनप्रीत सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. साश्रूनयांनी सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
अंत्ययात्रा सुरु असताना सर्व गावकरी सोबत चालत होते. यावेळी 'शहीद मनप्रीत सिंग अमर रहे' अशा घोषणा दिल्या जात होत्या.
अनंतनाग येथे दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या कारवाईचं कर्नल मनप्रीत सिंग नेतृत्व करत होते. ते कमांडिग अधिकारीही होते.
कर्नल मनप्रीत यांच्या भावाने सांगितलं की, 13 सप्टेंबरला आम्ही फोन केला होता पण त्यांनी उचलला नाही. व्यग्र असल्यास ते तसं सांगत असत. नंतर आम्हाला ते शहीद झाल्याची बातमी मिळाली.
शहीद मनप्रीत सिंग यांच्या कुटुंबातील मागील तीन पिढ्या लष्करात रुजू होऊन देशसेवा करत आहेत.