महाराष्ट्रासह देशभरात गोकुळाष्टमीचा उत्साह शिगेला पोहचलाय. ठिकठिकाणी दहीहंडीची सराव शिबिरे चालू आहेत. पण जन्माष्टमीला पूजेवेळी लागणारं साहित्य काय असायला हवं हे माहितीये का? चला तर पाहूया घरात समृद्धी नांदण्यासाठी पूजेला हव्याच अशा गोष्टी

मोरपिस

श्रीकृष्णाच्या माथ्यावर असणाऱ्या मोरपिसाला जन्माष्टमीच्या पूजेत खूप महत्वाचे स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार मोरपिस हे चांगल्या ऊर्जेचे प्रतीक असते.

लोणी

श्रीकृष्णाला लोणी किती प्रिय होते हे तर सर्वांना माहितीच आहे. आणि त्यामुळेच जन्माष्टमीची पूजा लोण्याविना अपूर्ण आहे.

वैजयंती माळ

कमळाच्या बियांपासून बनवलेल्या या माळेत लक्ष्मी मातेचा वास असतो अशी मान्यता आहे. तुमच्या घरी ही माळ असल्यास तुम्हाला कधीच पैश्यांची कमतरता जाणवणार नाही.

बासरी

श्रीकृष्णाला मुरलीधर असेही म्हणतात. त्यामुळे जन्माष्टमीला बासरीचे खूप महत्व आहे.

गाईची मूर्ती

श्रीकृष्णाला गायींचा फार लळा होता. त्यामुळे पूजेत गायीची मूर्ती जरूर ठेवावी. (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

VIEW ALL

Read Next Story