IQ level Increasing Foods : स्मरणशक्ती वाढवण्यासाठी चांगल्या आहाराची गरज आहे. सर्व मानसिक समस्या थेट मनाशी संबंधित आहेत. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रेन अर्थात मेंदू निरोगी (Brain Healthy) ठेवणे आहे. जर तुमचे मन निरोगी असेल तर तुम्ही मानसिक समस्यांपासून खूप दूर असाल.
IQ level Increasing Foods : काही पदार्थ हे पोषक तत्वांनी भरपूर असतात. ते आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात. तुमची IQ लेव्हर वाढवायची असले तर असे काही चांगल्या पदार्थांचे सेवन करणे योग्य ठरते. हळदीचे सेवन संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे. पण ते मेंदूसाठी अधिक फायदेशीर असते.
होल ग्रेन अर्थात संपूर्ण धान्य खाल्ल्यानेही व्हिटॅमिन ई पुरेशा प्रमाणात मिळते. संपूर्ण धान्य व्हिटॅमिन ई चा चांगला स्रोत आहे. म्हणून, मेंदूची शक्ती सुधारण्यासाठी मदत होते. ब्राउन राइस (Brown rice) , बार्ली (Barley) , बलगर गहू (Bulgur wheat) ओटमील यात चांगले पोषक घटक असतात.
तीळ, अक्रोड आणि अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड भरपूर असते. जे मेंदूची क्षमता वाढवू शकतात. हे पदार्थ दररोज खाणे चांगले.
ड्रायफ्रुट्समध्ये व्हिटॅमिन्स, ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि अँटी-ऑक्सीडेंट्स असतात. जे मेंदूची ताकद अर्थात शक्ती वाढविण्यास मदत करतात.
ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन्स डी तसेच प्रोटीनने भरपूर असलेले मासे खाणे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. त्यामुळे तुमची आयक्यू लेव्हल वाढते.
भाजके चणे खाणे चांगले. अशा चण्यांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरलसारखी पोषक तत्वं असतात. यामुले आपली स्मरणशक्ती वाढते.
हिरव्या पालेभाज्या खाणे चांगले असते. पोषक तत्त्वांनी युक्त असलेल्या हिरव्या भाज्यांमुळे IQ वाढविण्यास मदत होते. ब्रोकोली, पालक या सारख्या भाज्या खाव्यात.
शंखपुष्पी आणि तुळस, आलं, मिंट, ब्राम्ही, कॅमोमाईल या सारखे घटक एकत्र करुन पेय करणे आणि ते पिणे चांगले असते. अशा पेयांमुळे मानसिक तणाव कमी होतो आणि आयक्यू लेव्हल वाढते.
नट्स आणि बिया खाणे मेंदूसाठी चांगले असू शकते. त्यात ओमेगा -3 फॅटी ऍसिड आणि अँटिऑक्सिडंट्स (Omega-3 fatty acids and antioxidants) असतात.